Happy Birthday Wishes in Marathi – 900+ वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Happy Birthday Wishes in Marathi – वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा – बर्थडे वर्षातून एकदा येतो. जर आपण एखाद्या Friend, Mother, father, Sister, Brother, Husband, Wife, Girlfriend तसेच Boyfriend यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा वेगळ्या पद्धतीने दिल्या, तर यामुळे त्यांना आनंदाचा एक विशेष अनुभव तर मिळेलच, पण ते त्यांच्यासाठी खास बनते. वर्षातील हा एक दिवस प्रत्येकाच्या आयुष्यात खूप आनंद घेऊन येतो. प्रत्येकाच्या आयुष्यात असा दिवस येतो जो खूप खास असतो, तो म्हणजे त्यांचा Birthday.

या दिवशी त्यांना सर्वत्र शुभेच्छा आणि Wishes मिळतात. या प्रसंगी तुमचे मित्र, मित्र आणि कुटुंबीयांना शुभेच्छा देण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी Happy Birthday Wishes in Marathi वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा अनोखा संग्रह घेऊन आलो आहोत.

Birthday Wishes in Marathi

माझ्या भावना समजून घेण्यासाठी माझे बेस्ट फ्रेंड झालात
मी नेहमी खुश राहावं म्हणून माझे जीवनसाथी बनलात
आजारी असल्यावर तुम्ही माझी आई झालात
आयुष्याशी संघर्ष करताना वडिलांसारख मार्गदर्शक बनलात
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

आठवणीत नाही सोबत तुझ्या रहायचंय
पहिलं नाही तर शेवटचं प्रेम तुझं व्हायचंय
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा जान

आयुष्यभरासाठी साथ दयायची कि नाही हा निर्णय तुझा आहे
पण मरेपर्यंत तुझी साथ देईल हा शब्द माझा आहे
Happy Birthday Jaan

आज एका खास मुलीचा वाढदिवस आहे जीने माझ्या
आयुष्याला विविध रंग दिले आणि माझ जीवनच बहरून गेल
ती दुसरी कोणी नसून ती माझी लाडकी परी आहे
माझ्या लाडक्या परीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

या मौल्यवान दिवशी तुझी सर्व स्वप्ने पूर्ण होऊ दे
तुझ्या यशाला सीमा न राहू दे आणि
तुझ्या आयुष्यात सुखाचा वर्षाव होऊ दे
जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा

Birthday Wishes in Marathi

तुम्ही माझ्या जीवनात आलेली
सर्वात चांगली गोष्ट आहात
मला इतके हास्य इतके आनंदी
आणि खूप-खूप प्रेम देऊन
तुम्ही माझं जीवन फुलवलं
आपल्या वाढदिवशी मला तुम्हाला
धन्यवाद द्यायला आवडेल
आणि मी आठवण करून देऊ इच्छित आहे
कि मी तुमच्यावर खूप-खूप प्रेम करते
वाढदिवसाच्या प्रेमभरे शुभेच्छा

तुझ्या जन्माने दुख विसरायला लावलं
तुझ्या सहवासाने जगायला शिकवलं
आणि तुझ्या असण्याने जीवन फुलांसारख बहरल
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

उत्तुंग आकाशाला गवसणी घालायला निघालेल्या परीला
बाबांकडून वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा

माझ्या आयुष्यात तुमची जागा दुसर कुणी घेऊच शकत नाही
तुम्ही मला इतक प्रेम दिल की तुमच्या शिवाय
मी जीवनाची कल्पनाच करू शकत नाही
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

माझी दुनिया तूच आहेस माझं सुख तूच आहेस
माझ्या जीवनाच्या वाटेवरील प्रकाश तूच आहेस
आणि तूच माझ्या जगण्याचा आधार आहेस
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

Birthday Wishes in Marathi

सूर्याच्या प्रकाशाने होते सकाळ
पक्ष्यांच्या गुजनाने होते प्रफुल्लित सकाळ आणि
तुझ्या हास्याने सुंदर होईल आजची ही वाढदिवसाची संध्याकाळ

मी तुला आताही तेच सांगते आणि
जेव्हा आपण 100 वर्षांचे होऊ
तेव्हा ही तेच सांगेन
तू माझ्या जीवनातले पहिले
आणि शेवटचे प्रेम आहेस

कोणत्याही वाढदिवसाच्या केकपेक्षा
दहापट गोड असलेल्या खास अशा
प्रेमास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

लहानपणापासून एकत्र राहतांना
भातुकलीचा खेळ खेळतांना
एकत्र अभ्यास करतांना
आणि बागेत मौजमजा करतांना
किती वेळा भांडलो असू आपण
पण तरीही मनातलं प्रेम माया
अगदी लहानपणी जशी होती
तशीच ती आजही आहे
उलट काळाच्या ओघात
ती अधिकाधिक द्दढ होत गेली
याचं सारं श्रेय खरं तर तुला
आणि तुझ्या प्रेमळ स्वभावाला
परमेश्वर तुला सदैव सुखात ठेवो

या पृथ्वी तलावरील सर्वात रुबाबदार
आणि सर्वात आनंदी व्यक्तीला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
तुझा आजचा दिवस अत्यंत मनोरंजक
आणि रोमांचक असावा हीच मनोमनी सदिच्छा

मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Happy Birthday Wishes in Marathi For Friend
मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Happy Birthday Wishes in Marathi For Friend

तू मला माझ्या आयुष्यात आनंद
प्रेम आणि प्रकाश दिला
मला आशा आहे की
तुझा वाढदिवस हा सर्वात
आनंददायक जाईल
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Happy Birthday Wishes in Marathi For Friend

तू या जगात आलास याचा मला खूप आनंद झाला
आणि खासकरून तू माझ्या जगात आलास
याचा मला खूपच आनंद होत आहे
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

तुझे स्मितहास्य उत्सव साजरा करण्याचे कारण आहे
तुझे प्रेम जगातील सर्वात मौल्यवान भेट आहे
तुझ्या चुंबनांच्या वर्षावात वाढदिवसाच्या
हजारो मेणबत्त्या पेटूवू इच्छिते
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

तुझ्या वाढदिवसाची ची भेट म्हणून या चांदण्यांच्या मैफिलीत
माझ्या मिठीत घेऊन तुझ्या गालाची पप्पी घ्यावीशी वाटते
आणि तुला हे दाखवून द्यावेसे वाटते कि
मी तुझी आहे याचा मला किती आनंद आहे

सर्वात दयाळू व माझ्या विचारवंत
नवऱ्याला हार्दिक शुभेच्छा

Happy Birthday Wishes in Marathi For Friend

उंबरठयावरचे माप ओलांडून वाहिनी म्हणून घरात आलीस
एक दिवस लक्षात आले तू तर माझी मैत्रीण झालीस
मनातल्या गूजगोष्टी तुला सांगत गेले
नणंद-भावजयीचे नाते मैत्रीचे झाले
आज आला आहे एक खास दिवस
माझ्या वाहिनीचा खास असा वाढदिवस
खूप खूप शुभेच्छाची भेट तुला देते
दीर्घायु आणि आरोग्य लाभो हीच प्रार्थना करते

आयुष्य खूप मौल्यवान आहे आणि
तुमचा प्रत्येक दिवस मौल्यवान असावा
मी प्रत्येक क्षणी तुमच्या जवळ आहे आणि
मी आणखी एक मौल्यवान वर्ष
तुमच्याबरोबर घालवल्याबद्दल कृतज्ञ आहे
तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

मी तुमच्या सोबत नसते तर
सूर्य चमकलाच नसता
ज्या दिवशी आपण माझ्या जवळ नसता
तो दिवस मला खूप मोठा वाटतो
ज्या दिवशी मला आपला स्पर्श जाणवत नाही
तो दिवस मला हताश आणि निराशजनक वाटतो
प्रिय आपण आतापर्यंतच्या
सर्वोत्कृष्ट वाढदिवसास पात्र आहात
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

तुझा स्पर्श होताच जाणीव होते
मला माझ्या असण्याची
तू नजरेसमोरून दूर होताच ओढ
लागते मला तुला पुन्हा भेटण्याची
Happy Birthday Dear

Happy Birthday Wishes in Marathi For Friend

दिवसाची सुरुवात आणि शेवटही
आज फक्त तुझ्यासाठी
अशीच आयुष्यभर साथ
तुला देतचं राहील
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा
हॅपी बर्थडे माय लव

तुला कोणी पाहिलंतर जीव माझा जळतो
जगापासून कुठे लपवू मग हा विचार मला पडतो
Happy Birthday Sweet Heart

आज तुमचा वाढदिवस आहे आणि
मला असे वाटते की आपण माझ्या
आयुष्यातील सर्वात महत्वपूर्ण व्यक्ती आहात
आणि हे सत्य उजागर करण्यासाठी योग्य दिवस आहे
माझ्या शुभेच्छा नेहमी तुमच्या सोबत आहेत
वाढदिवसाच्या शुभेच्छा

प्रिय पतीदेवा आपले वर्णन करण्यासाठी काही
खास शब्दः अद्भुत आश्चर्यकारक अद्वितीय
अतुलनीय Handsome देखणा मजबूत अविश्वसनीय
आपली साथ कायम असो
तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

Happy Birthday Wishes in Marathi For Friend

तू माझ्या आयुष्यात असण्याने मी खरंच खूप आनंदी आहे
आतापर्यंत माझ्या प्रत्येक वेळेत माझी खंबीर साथ दिल्याबद्दल धन्यवाद
वाढदिवसानिमित्त माझ्या सुंदर पत्नीस हार्दिक शुभेच्छा

कितीही रागावले तरी समजून घेतले मला
रुसले कधी तर जवळ घेतले मला
रडवले कधी तर कधी हसवले
केल्या पूर्ण सर्व माझ्या इच्छा
वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा

नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा

Happy Birthday Wishes in Marathi For Husband
नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा

Happy Birthday Wishes in Marathi For Husband

आपले दुःख मनात लपवून
दुसऱ्यांना सुखी ठेवणारा देवमाणूस
म्हणजे वडील
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा

Happy Birthday Wishes in Marathi For Husband

Life मधील प्रत्येक Goal असावा Clear
तुला Success मिळो Without any Fear
प्रत्येक क्षण जग Without any Tear
Enjoy your day my Dear
हैप्पी बर्थडे डिअर

आपले लाडके गोजीरे
डझनभर पोरिंच्या मनावर राज्य करणारे
मुलींमधे डॅशिंग बॉय
या नावाने प्रसिद्द असलेल्या
आपल्या रॉयल भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

आई तू माझ्या मंदिरातील देव आहे
किती हि सेवा केली तरी ती कमीच आहे
तुझे कष्ट अपार आहेत
तुझ्यासाठी मात्र मी तुझा श्वास आहे
तू माझ्या आयुष्याला वळण दिले
हाताचा पाळणा करून मला वाढवले
तुझे संस्कार माझ्यात रुजवले
कष्ट करायची गोडी मी तुझ्याकडून शिकले
किती गाऊ आई तुझी थोरवी
या जगात तुझ्यासारखे कोणीच नाही
प्रत्येक दिवस हा तुझ्या आयुष्यात आनंद घेऊन यावा
हेच आता देवाकडे मागणे आहे
आई तुला वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा

तुम्ही नेहमी चांगल्या आणि वाईट
काळात माझ्या सोबत राहिलात
आणि आपण माझ्यासाठी जे
काही करता त्याबद्दल धन्यवाद माझ्या प्रिय
पतिदेवास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Happy Birthday Wishes in Marathi For Husband

वाद झाला तरी चालेल पण
भावाच्या बर्थ डे ला DJ
लावून नाद झालाच पाहिजे
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

साखरेसारख्या
गोड माणसाला मुंग्या
लागेस्तोवर वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा

विश्वातील सर्वोत्तम सर्वात समजूतदार आणि प्रेमळ
पतीसाठी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

होळीचा रंग वहिनी मैत्रीची चाहूल वहिनी
प्रेमाचे बोल वहिनी रस्त्यातील वाट वहिनी
मायेची सावली वहिनी मातीची थाप वहिनी
ओये हिरो म्हणून काम सांगणारी वहिनी
बहिणीची आस पुरवणारी वहिनी
पाकळ्यांचे फुल वहिनी हृदयातील आवाज वहिनी
अशा या लाडक्या वहिनीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

आईच्या मायेला जोड नाही
ताईच्या प्रेमाला तोड नाही
मायेची सावली आहेस तू
घराची शान आहेस तू
तुझे खळखळतं हास्य म्हणजे आईबाबांचे सुख आहे
तू अशीच हसत सुखात राहावी
हीच माझी इच्छा आहे
लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Happy Birthday Wishes in Marathi For Husband

देवानेही उत्सव बनवला असेल
ज्या दिवशी तुला बनवले असेल
त्याचेही डोळ्यात पाणी आले असेल
ज्या दिवशी तुला धरतीवर पाठवले असेल
अशा माझ्या प्रिय पत्नीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

तुझा वाढदिवस म्हणजे एक सुंदर फूल आहे
जे माझ्या जीवनरूपी बागेत प्रत्येक वर्षी सुगंध देत आहे
तुझ माझ्या आयुष्यात असणं म्हणजे जसा सूर्य आकाशात आहे
जो जीवनभर माझ्या आयुष्यात प्रकाश देत आहे
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

ठेच लागता माझ्या पायी वेदना होती तिच्या हृदयी
तेहतीस कोटी देवांहूनही श्रेष्ठ मला माझी आई
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई

Happy Birthday Wishes in Marathi For Husband

माझ्या आयुष्यात सोनेरी सुर्यकिरणांसारखं तेज घेऊन आल्याबद्दल
आणि माझ्यावर सुखाचा वर्षाव केल्याबद्दल मी तुमची खूप आभारी आहे
तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

आई माझी मायेचा झरा दिला तिने जीवनाला आधार
ठेच लागता माझ्या पायी वेदना होती तिच्या हृदयी
तेहतीस कोटी देवांमध्ये श्रेष्ठ मला माझी आई
आई तुला उदंड आयुष्याच्या
अनंत शुभेच्छा

बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा

Happy Birthday Wishes in Marathi For Wife
बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा

Happy Birthday Wishes in Marathi For Wife

तू नव्हतीस तेव्हाही मी जगतच होतो नाही असं नाही
पण तुझ्या येण्याने आयुष्याची बाग खर्‍या अर्थाने बहरून आली
पूर्वीचेच क्षण तुझ्या सहवासात नव्या आनंदाने बहरून आले
पूर्वीचेच दिवस तुझ्याप्रमाणे नव्या चैतन्याने सजून गेले
आता आणखी काही नको
हवी आहे ती फक्त तुझी साथ आणि तुझ्या प्रेमाचं अनमोल नातं
बस्स आणखी काही नको
वाढदिवसाच्या शुभेच्छा बायको

Happy Birthday Wishes in Marathi For Wife

जगातील सर्वात प्रेमळ आईला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

जगासाठी तू फक्त आणि फक्त एक व्यक्ती आहेस गं
पण माझासाठी तर तूच माझी संपूर्ण दुनिया आहेस
वाढदिवसाच्या शुभेच्छा बायको

बाबांचा मला कळलेला अर्थ
बाबा म्हणजे अपरिमित कष्ट करणारं शरीर
अपरिमित काळजी करणारं मन
स्वतः च्या इच्छा आकांक्षा बाजूला ठेवून
मुलांसाठी झटणारं अंतःकरण
बाबा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

तुझा चेहरा नेहमी असाच आनंदाने फुललेला राहो
पक्ष्यांच्या थव्या प्रमाणे बहरलेला राहो
जे पण जीवनात तुझी मागणी असेल ते तुला विना मागता प्राप्त हो
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

तुझ्या प्रेमाने प्रत्येक दिवस उत्सवा सारखा वाटतो
पण आजचा दिवस खास आहे कारण आज माझं प्रेम या जगात आलं होतं
अश्या जिवलग प्रेमाला वाढदिवसाच्या शुभेच्छा

Happy Birthday Wishes in Marathi For Wife

देशातील सर्वात मोठं रहस्य म्हणजे तुझं वय असो
रहस्य असंच कायम राहो आणि तुझा वाढदिवस छान साजरा होवो
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

देव पण न माहिती नाही कसे नाते जुळवीतो
अनोळखी माणसाला हृदयात स्थान देतो
ज्यांना कधी ओळखत हि नसतो
त्यांना पार जीवाचे जिवलग बनवतो
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

आज जेव्हा तू तुझ्या वाढदिवसाचा केक कापशील
तेव्हा मी देवाला धन्यवाद देईल मला असा निर्मळ
प्रेमळ आणि निरागस जीवनसाथी दिल्याबद्दल
माझ्या प्रेमाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

सर्व जगाहून वेगळी आहे माझी बहीण
सर्व जगात मला प्रिय आहे माझी बहीण
फक्त आंनदच सर्वकाही नसतो
मला माझ्या आंनदाहूनही प्रिय आहे माझी बहीण
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दीदी

आजचा दिवस खास आहे
आज जगातली सर्वात अनमोल भेट आम्हाला मिळाली
चिमुकल्या पाउलांनी छोटीसी परी आमच्या घरी आली
आणि आमचं सगळं आयुष्यच बदलून गेली
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Happy Birthday Wishes in Marathi For Wife

तुझा वाढदिवस आहे खास
कारण तु आहेस सगळ्यांसाठी खास
आज पूर्ण होवो तुझी इच्छा खास

माझ्यासोबत राहिलेला जीवनाचा प्रत्येक क्षण
माझ्या आठवणीत कायमस्वरूपी राहील
तुझ्यासोबत गेलेले प्रत्येक क्षण न कळता
कित्येक प्रेमाच्या आठवणींचा संग्रह राहील
आज ह्या क्षणाला आपण अजून सुंदर बनवूया
वाढदिवसाच्या सहृदय खूप खूप शुभेच्छा

आजचा दिवस खास आहे
ज्याचा प्रत्येक क्षण मला तुझ्यासोबत घालवायचा आहे
कारणच तसं आहे कारण आज तुझा वाढदिवस आहे

आई माझी सर्वप्रथम गुरू
तिच्यापासूनच माझे अस्तित्व सुरू
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई

भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा

Happy Birthday Wishes in Marathi For Brother
भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा

Happy Birthday Wishes in Marathi For Brother

तू आमच्या जीवनातील एक सुंदर परी आहेस
मंमी पपाची छोटीसी बाहुली आहेस
तूच आमच विश्व आणि तूच आमचा प्राण आहेस

Happy Birthday Wishes in Marathi For Brother

प्राणाहून प्रिय बायको
तुला वाढदिवसा निमित्त
उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा

काळजाचा ठोका म्हना किंवा शरिरातील प्राण
असाहा आपला मित्र आहेे
भाऊ आयुष्याच्या वाटेत भेटलेला कोहीनुर हिराच आहे
काळजाच्या या तुकड्याला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

भाऊचा बर्थ डे म्हणल्यावर चर्चा तर होणार
भाऊ नी राडा येवढा केलाय की
भाऊच्या बर्थ डे ला चर्चा कमी पण मोर्चाच निघेल
अश्या किलर लूक वाल्या माझ्या भावासारख्या मित्राला
जन्मदिवसाच्या मनापासून लाख लाख शुभेच्छा

तू ते गुलाब नाही जे बागेत फुलतं
तू तर माझ्या जीवनातील ती शान आहे
ज्याच्या गर्वाने माझे माझं हृदय फुलतं
तुझ्या चेहऱ्यावरचे प्रत्येक हसू माझ्यासाठी एक भेट असतं
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

पार्ट्या करा खा प्या
नाच गाणे फटाके फोडा
पण वाढदिवसाच्या या पावन समयी
मित्रांना हि वेळ द्या कि थोडा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Happy Birthday Wishes in Marathi For Brother

माझा प्रत्येक श्वास आणि प्रत्येक आनंद तुझा आहे
माझ्या प्रत्येक श्वासात तुझा श्वास दडलेला आहे
क्षणभर ही नाही राहु शकत तुझ्याविना कारण
हृदयाच्या ठोक्यांच्या आवाजात तू वसलेली आहे
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बायको

आई नंतर जर तुमच्यावर
जीव टाकणारी कोणती व्यक्ती असेल
तर ती तुमची बहीण असते
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ताई

तुझं आयुष्य ईमानदारीने जग
हळूहळू खा आणि तुझ्या वयाबाबत खोटं बोलायलाही शिक
वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा

स्माईल हिची खास
तर कधी ऍटिट्यूड पन झक्कास
कधी आंबट तर कधी गोड शब्दांचा घास
कधीमधी आवडीने सवडीने बोलनारी
बिनधास्त बोलता बोलता टोमणे मारणारी
व्हाट्स अँप चे स्टेटस पाहताना उगीच गालातल्या गालात हसणारी
आणि विशेष म्हणजे भांडण करण्यात कायम अग्रेसर राहणारी
थोडीशी रागीट थोडीशी प्रेमळ
चेहेऱ्यावर कायम स्माईल आसणारी
असो आयुष्याच्या प्रत्येक क्षणी नव्याने उमलत रहा
सुंदर गोड फुलाप्रमाणे फुलत रहा
आयुष्याच्या वाटेवर आनंदाचे क्षण वेचत रहा
प्रत्येक संकटांना दुःखाला समर्थपणे हरवत रहा
नेहमी हसत आनंदी रहा

आयुष्यामध्ये बरीच माणसं भेटतात
काही चांगले काही वाईट
काही कधीच लक्षात न राहणारे
आणि काही कायमस्वरूपी मनात घर
करून राहतात त्यातलेच तुम्ही एक आहात
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Happy Birthday Wishes in Marathi For Brother

सगळ्याच माणसांचे वाढदिवस आपण साजरे करतो
पण त्यातले काही वाढदिवस असे असतात जे
साजरे करताना मन एका वेगळ्याच विश्वात हरवून जातं
कारण ते असतात आपल्या मनात घर
करून बसलेल्या काही खास माणसांचे वाढदिवस
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

आयुष्याच्या अवघड वाटेवर तू दिलीस मला साथ
कोणत्याही क्षणी सोडला नाहीस तू हातातला हात
कधी चिडलो भांडलो कधी झाले जरी भरपूर वाद
पण दुसऱ्याच क्षणी कानी आली तुझी प्रेमळ साद
प्रिये तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

हसत राहा तू सदैव करोडोंच्या गर्दीत
चमकत राहा तू हजारांच्या गर्दीत
जसा सूर्य चमकतो आकाशात तसाच तू उजळत राहा
तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

काही माणसं स्वभावाने कशी का असेनात
मनाने मात्र ती फार सच्ची आणि प्रामाणिक असतात
अशा माणसांपैकीच एक म्हणजेच तुम्ही
म्हणूनच तुमच्याविषयी मनात असणारा
स्नेह अगदी अतूट आणि जिव्हाळ्याचा आहे
तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा

बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

Happy Birthday Wishes in Marathi For Sister
बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

Happy Birthday Wishes in Marathi For Sister

तू आहेस म्हणून मी आहे
तुझ्याशिवाय जीवन अपुर्ण आहे
तूच माझ्या जीवनाची सुरुवात
आणि तूच शेवट आहेस
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा पिल्लू

Happy Birthday Wishes in Marathi For Sister

लखलखते तारे सळसळते वारे
फुलणारी फुले इंद्रधनुष्याचे झुले
तुझ्यासाठीच उभे आज सारे तारे
वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा

आमचे लाडके भाऊ
दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस
आमच्या गावची शान
हजारो लाखो पोरींची जान असलेले
अत्यंत हँडसम उत्तुंग आणि राजबिंडा व्यक्तिमत्व असलेले
मित्रासाठी कायपण कधीपण आणि कुठंपण या तत्वावर चालणारे
मित्रांमध्ये दिलखुलास पैसे खर्च करणारे
लाखो मुलींच्या मनात घर करून बसलेले
सळसळीत रक्त अशी पर्सनॅलिटी
मित्रांच्या दुःखात सहभागी होणारे
असे आमचे खास लाडके मित्र यां‍ना
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Happy Birthday Wishes in Marathi For Sister

जगातील सर्वात प्रतिभावान पत्नीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
जगात कोणीही तुझ्याप्रमाणे मला माझ्या कार्य प्रति प्रोत्साहित करत नाही
किंवा तुझ्यासारखी प्रेरणाही मला जगात कुठेच मिळत नाही
एक संस्कारी पत्नी म्हणून माझी साथ दिल्याबद्दल धन्यवाद

देवा माझ्या मित्राला सुखात ठेव
त्याचा वाढदिवस कधी ही असुदे
प्रत्येक वेळी मी तुझ्याकडे येवढेच मागणे मागतो
त्याला आनंदी ठेव
Happy Birthday Mitra

तू आमच्या जीवनातील एक सुंदर परी आहेस
मम्मी पप्पांची छोटीशी बाहुली आहेस
तूच आमच विश्व आणि तूच आमचा प्राण आहेस
लाडक्या लेकीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

हसणाऱ्या हृदयातही दुःख आहे
हसणाऱ्या डोळ्यातही कधी अश्रू येतात
पण मी एकच प्रार्थना करेन तुझं हसू कधीच थांबू नये
कारण तुझ्या हास्याचे आम्हीही दिवाने आहोत
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

आयुष्यातले सगळे क्षण आठवणीत राहतात असं नाही
पण काही क्षण असे असतात जे विसरु म्हणताही विसरता येत नाहीत
हा वाढदिवस म्हणजे त्या अनंत क्षणातला असाच एक क्षण
हा क्षण मनाला एक वेगळ समाधान देईलच पण
आमच्या शुभेच्छानी वाढदिवसाचा हा क्षण एक सण होऊ दे हीच सदिच्छा
वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा

Happy Birthday Wishes in Marathi For Sister

तुमच्या आनंदाची फुलं सदैव बहरलेली असावीत
तुमचे आयुष्य एक अनमोल आदर्श बनावे
ईश्वर आपणास दीर्घायुष्य देवो
आपल्या आयुष्यात आपणास हवे ते मिळो
आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

चांगले मित्र येतील आणि जातील
पण तुम्ही नक्कीच माझे खास
आणि जिवाभावाचे सोबती असाल
मला तुझ्यापेक्षा चांगले कोणीही समजत नाही
मी खूप नशीबवान आहे कारण
तुमच्या सारखे मित्र माझ्या जीवनात आहेत
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

मी श्वास घेण्याचं एकमेव कारण आहेस तू
माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम गोष्ट आहेस तू
माझं पहिलं आणि शेवटचं प्रेम आहेस तू
माझी अर्धांगिनी माझ्या हृदयाची राणी आहेस तू
आजचा दिवस माझ्यासाठी खूप खास आहे
तुला वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा

वाढदिवस येतो
स्नेही आणि मित्रांचे प्रेम देतो
एक नवीन स्वप्न घेऊन येतो
जीवनात आनंदाच्या क्षणांना उजाळा देत
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

तुझ्या वाढदिवशी मला जाणवलं की
मी जगातील सर्वात सुंदर आणि प्रेमळ
स्त्रीबरोबर आणखी एक वर्ष जगलो आहे
तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

Happy Birthday Wishes in Marathi For Sister

शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करीत रहावी
कधी वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी
तुमच्या इच्छा आकांक्षांचा वेलू गगनाला भिडू दे
तुमच्या जीवनात सर्वकाही मनासारखे घडू दे
तुला दिर्घ आयुष्य लाभो ही इच्छा

तुम्हाला तुमच्या आयुष्यात खूप सारं यश मिळावं
तुमचं जीवन उमलत्या कळीसारखं फुलावं
त्याच सुगंध तुमच्या जीवनात दरवळत राहो
हीच देवाकडे प्रार्थना आहे
वाढदिवसाच्या तुम्हाला खूप साऱ्या शिवमय शुभेच्छा

वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

Happy Birthday Wishes in Marathi For Father
वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

Happy Birthday Wishes in Marathi For Father

आपल्या दोस्ताची किंमत नाही आणि
किंमत करायला कोणाच्या बापात हिंमत नाही
वाघासारख्या भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Happy Birthday Wishes in Marathi For Father

मनाला अवीट आनंद देणारा
तुझ्या वाढदिवसाचा क्षण आला की
वाटतं आयुष्य आनंदाने भरलेलं आहे
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा

जे देवाकडे मागशील तू ते तुला मिळो
हीच आज देवाकडे मागणी आहे माझी
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा

तुझ्या ईच्छा आकांक्षा उंच भरारी घेऊ दे
मनात आमच्या एकच ईच्छा तुला उदंड आयुष्य लाभुदे
लाडक्या परीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

आयुष्यात सगळी सुख तुला मिळो
फक्त मला बर्थडे पार्टी
द्यायला विसरू नको
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ

प्रत्येक वाढदिवसागणिक तुमच्या यशाचं आभाळ
अधिक अधिक विस्तारीत होत जावो
तुमच्या समृध्दीच्या सागाराला किनारा नसावा
तुमच्या आनंदाची फुलं सदैव बहरलेली असावीत
आपले पुढिल आयुष्य सुख समृद्धि आणि ऐश्वर्य संपन्न होवो हीच सदिच्छा
वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा

तुला तुझ्या आयुष्यात सुख आनंद व यश लाभो
तुझे जीवन हे उमलत्या फुलासारखे फुलून जावो
त्याचा सुगंध तुझ्या सर्व जीवनात दरवळत राहो
हीच तुझ्या वाढदिवसानिमीत्त ईश्वरचरणी प्रार्थना
शिवमय वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

जन्मापासूनच जिम चा शोकीन असलेले
जन्मल्या जन्मल्या नर्स जवळची दुधाची बाटली ला डंबेल
समजून ६ पॅक चे स्वप्न पाहणारे आणि जिम ला जाणारे
काही कामधाम नसतांना उगाच आपल्या
सासुरवाडीला प्रत्येक वीकएंड ला चक्कर मारणारे
कोणी सेल्फी काढत असला कि वेड
वाकडा तोंड करून सेल्फी चा मोह करणारे
दोस्ती करावी तर मरेपर्यंत या तत्वावर चालणारे
तालुक्यावर हवा करत असणारे अशे आमचे जवळचे मित्र
दोस्तीच्या दुनियेतला जिगर माणूस
यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

ह्या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी
आपली सारी स्वप्नं साकार व्हावी
आजचा वाढदिवस आपल्यासाठी
एक अनमोल आठवण ठरावी…
आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य
अधिकाधिक सुंदर व्हावं हीच शुभेच्छा

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ

वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला झाला लेट
पन थोड्याच वेळात त्या तुझ्यापर्यंत पोचतील थेट

नवे क्षितीज नवी पाहट
फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट
स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहो
तुमच्या पाठीशी हजोरो सुर्य तळपत राहो
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

तुझा वाढदिवस म्हणजे आनंदाचा झुळझुळ झरा
सळसळणारा शीतल वारा
तुझा वाढदिवस म्हणजे सोनपिवळ्या
उन्हामधल्या रिमझिमणाऱ्या श्रावणधारा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

कधी कधी असंही होतं
फार महत्वाचं म्हणून जपलेलं
ऐनवेळी विसरून जातं
तुझ्या वाढदिवसाचं असंच झालं
विश्वास आहे कि
हे तू समजून घेशील
वाढदिवसाच्या उशिरा दिलेल्या शुभेच्छा

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ

दिवस आज आहे खास
तुला उदंड आयुष्य लाभो हाच मनी ध्यास
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

नवा गंध नवा आनंद निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा
नव्या सुखांनी नव्या वैभवांनी आनंद शतगुणित व्हावा
ह्याच तुम्हांला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा

आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी

Happy Birthday Wishes in Marathi For Mother
आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी

Happy Birthday Wishes in Marathi For Mother

झेप अशी घ्या की पाहणाऱ्यांच्या माना दुखाव्यात
आकाशाला अशी गवसणी घाला की पक्ष्यांना प्रश्न पडावा
ज्ञान असे मिळवा की सागर अचंबित व्हावा
इतकी प्रगती करा की काळही पहात राहावा
हीच आपणास वाढदिवसा निमित्त मनस्वी शुभकामना

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी

तुमच्या वाढदिवसाचे हे सुखदायी क्षण तुम्हाला सदैव आनंददायी ठेवत राहो
आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी तुमच्या हृदयात सतत तेवत राहो
हीच मनस्वी शुभकामना

संकल्प असावेत नवे तुझे
मिळाव्यात त्यांना नव्या दिशा
प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे तुझे
ह्याच वाढदिवसाच्या शुभेच्छा

उगवता सुर्य तुम्हाला आशीर्वाद देवो
बहरलेली फुले तुम्हाला सुगंध देवो
आणि परमेश्वर आपणांस सदैव सुखात ठेवो
वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा

शिवछत्रपतींच्या आशीर्वादाने गाठावी यशाची शिखरे
आदर्श शंभूचा ठेवता लाभो मस्तकी मानाचे तुरे
जन्मदिवसाच्या लाख लाख शिव शुभेच्छा
आऊसाहेब जिजाऊ आपणास उदंड आयुष्य देवो हीच इच्छा

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी

तुला तुझ्या आयुष्यात सुख
आनंद व यश लाभो
तुझे जीवन हे उमलत्या
फुलासारखे फुलून जावो
त्याचा सुगंध तुझ्या सर्व
जीवनात दरवळत राहो
हीच तुझ्या वाढदिवसानिमित्त
ईश्वरचरणी प्रार्थना
वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा

कधी रुसलीस कधी हसलीस
राग कधी आलाच माझा तर उपाशी झोपलीस
मनातले दुःख कधी समजू नाही दिलेस
पण आयुष्यात तू मला खूप सुख दिलेस…
वाढदिवसाच्या शुभेच्छा

माणसांच्या या गर्दीत अनेक चेहरे भेटतात…
काही चांगले काही वाईट काही कधीच लक्षात न राहणारे
आणि काही कायमचे मनात घर करणारे
मनात घर करणारी जी अनेक माणसं
जगतांना लाभली त्यातले एक तुम्ही
म्हणूनच या वाढदिवसानिमित्त आपुलकीच्या शुभेच्छा

आजचा दिवस आमच्यासाठीही खास आहे
तुला उदंड आयुष्य लाभो
मनी हाच ध्यास आहे
यशस्वी हो औक्षवंत हो
अनेक आशीर्वादांसह
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी

कितीही रागावले तरी समजून घेतले मला
रुसले कधी तर जवळ घेतले मला
रडवले कधी तर कधी हसवले
केल्या पूर्ण सर्व माझ्या इच्छा
वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा

सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे
a सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस
सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा
केवळ सोन्यासारख्या लोकांना

प्रेयसीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश

Happy Birthday Wishes in Marathi For Girlfriend
प्रेयसीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश

Happy Birthday Wishes in Marathi For Girlfriend

आयुष्याच्या या पायरीवर
तुमच्या नव्या जगातील नव्या स्वप्नांना बहर येऊ दे
तुमच्या इच्छा तुमच्या आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ दे
मनात आमच्या एकच इच्छा
आपणास उद्दंड आयुष्य लाभू दे…
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी

नवा गंद नवा आनंद
निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा
व नव्या सुखांनी नव्या वैभवांनी
आनंद शतगुणित व्हावा
ह्याच तुम्हांला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा

कोणाच्या हुकमावर नाय जगत
स्वताच्या रूबाबवर जगतोय
अशा दिलदार व्यक्तिमत्वाला
जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा

वर्षाचे ३६५ दिवस_महिन्याचे ३० दिवस
हफ्त्याचे ७ दिवस
आणि माझ्या आवडीचा १ दिवस
तो म्हणजे माझ्या भावाचा वाढदिवस
भाऊ तुला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा

चाहूल तुझी लागताच आनंदी झालो आम्ही
तुझ्या बाललीलांमध्ये रमून गेलो आम्ही
यशवंत हो दीर्घायुषी हो
बाळा तुला आजीआजोबांकडून
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी

दिसायला एखाद्या हिरो ला ही लाजवणारे
कॅडबरी बाॅय आपले लाडके गोजीरे
डझनभर पोरिंच्या मनावर राज्य करणारे
मुलींमधे dashing_boy या नावाने प्रसिद्द असलेले
आपल्या Royal भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

मी खूप भाग्यवान आहे
मला बहीण मिळाली
माझ्या मनातील भावना समजणारी
मला एक सोबती मिळाली
प्रत्येक जन्मी तूच माझी बहीण असावीस
आजच्या दिवशी मला तू बहीण म्हणून मिळालीस
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

आपल्याला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा
तुमच्या मनातील सर्व स्वप्न पूर्ण होऊ दे
आपल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होउदे
तुमच्या सर्व प्रयत्नाना यश मिळू दे
हीच ईशवर चरणी प्रार्थना

नाती जपली प्रेम दिले
या परिवारास तू पूर्ण केले
पूर्ण होवो तुझी प्रत्येक इच्छा
वाढदिवशी हीच एक सदिच्छा

Happy Birthday Wishes in Marathi For Girlfriend

नेहमी आनंदी रहा
कधीच दुःख तुमच्या वाटेला येऊ नये
समुद्रासारखी खोल तुमची ख्याती व्हावी
आणि आभाळाएवढ ह्रदय व्हावं
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

झेप अशी घ्या की पाहणा-यांच्या माना दुखाव्यात
आकाशाला अशी गवसणी घाला की पक्ष्यांना प्रश्न पडावा
ज्ञान इतके मिळवा की सागर अचंबित व्हावा
इतकी प्रगती करा की काळ ही पाहत रहावा
कर्तुत्वाच्या अग्निबाणाने ध्येयाचे गगन भेदून यशाचा
लख्ख प्रकाश तुम्ही चोहीकडे पसरवा…
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

नवा गंद नवा आनंद
निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा
व नव्या सुखांनी नव्या वैभवांनी
आनंद शतगुणित व्हावा…
तुम्हाला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा

प्रियकराला वाढदिवसाच्या शुभेच्छा

Happy Birthday Wishes in Marathi For Boyfriend
प्रियकराला वाढदिवसाच्या शुभेच्छा

Happy Birthday Wishes in Marathi For Boyfriend

येणारा प्रत्येक दिवस हा माझ्या परीचा असावा
जीवनात तुझ्या कधी दुःखाचा क्षण नसावा
मनात तुझ्या जे जे असेल ते ते तुला मिळावे
प्रयत्नांना तुझ्या नेहमी उदंड यश लाभावे
हसत खेळत पूर्ण व्हाव्या तुझ्या सर्व इच्छा
परी तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा

Happy Birthday Wishes in Marathi For Boyfriend

देवाकडे जे काही तुम्ही मागणार ते सर्व तुम्हाला मिळो
आयुष्याच्या या नवीन वाटेवर
तुमच्या नवीन स्वप्नांना भरारी मिळो
तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करण्याची शक्ती तुम्हाला मिळो
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

हे देवा
तुझ्या प्रार्थनांची उब माझ्या बहिणीवर राहू दे
सर्व सुखांनी सजलेलं माझ्या बहिणीचं घर असू दे

सर्वात वेगळी आहे माझी बहीण
सगळ्यात प्रेमळ आहे माझी बहीण
कोण म्हणतं आयुष्यात सुखच आहे सर्वकाही
माझ्यासाठी माझी बहीणच आहे सर्वकाही
हॅपी बर्थडे ताई

तुमच्या स्वप्नांना किनारा नसावा
तुमच्या इच्छा शक्तीला प्रतिबंध नसावा
जेव्हा तुम्ही एक तारा मागणार
तेव्हा देव तुम्हाला सर्व आकाश देवो
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Happy Birthday Wishes in Marathi For Boyfriend

सागरासारखी अथांग माया भरलीय तुझ्या हृदयात
कधी कधी तर तू मला आपली आईच वाटतेस
माझ्या भावनांना केवळ तूच समजून घेतेस
माझ्या जराशा दुःखाने तुझे डोळे भरून येतात
अशी माझ्याबद्दल हळवी असणारी दीदी तू
कधी कधी प्रसंगी खूप खंबीरही वाटतेस
मनात आत्मविश्वास तुझ्यामुळेच जागृत होतो
तूच आम्हाला धीर देतेस
तू नेहमी सुखात रहावी हीच सदिच्छा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

तुझा वाढदिवस आमच्यासाठी जणु पर्वणीच असते
ओली असो वा सुकी असो
पार्टी तर ठरलेलीच असते
मग कधी करायची पार्टी?
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा

बाबा तुमच्या मायेचा स्पर्श उबदार
नेहमीच दिलात आश्वासक आधार
तुम्हीच दिलात उत्साह आणि विश्वास
जणू बनलात आमचे श्वास
तुमच्या जन्मदिनी प्रार्थना देवाला
सुख समाधान मिळो तुम्हाला
तुम्हाला दीर्घायु लाभू दे
तुमचे स्वप्न पूर्ण करण्याचे बळ आम्हा मिळू दे
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Happy Birthday Wishes in Marathi For Boyfriend

तुझ्या वाढदिवसाचे हे सुखदायी क्षण
तुला सदैव आनंददायी ठेवत राहो
आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी
तुझ्या हृदयात सतत तेवत राहो
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

वाढदिवस येतो
स्नेही आणि मित्रांचे प्रेम देतो
एक नवीन स्वप्न घेऊन येतो
जीवनात आनंदाच्या क्षणांना उजाळा देतो
आयुष्याला योग्य दिशा देतो
जीवन किती सुंदर आहे हळूच सांगून जातो
आपणास उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा

मुलींसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा

Happy Birthday Wishes in Marathi For Girl
मुलींसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा

Happy Birthday Wishes in Marathi For Girl

तू नव्हतीस तेव्हाही मी जगतच होतो
नाहीच असं नाही पण तुझ्या
येण्याने आयुष्याची बाग खर्‍या अर्थाने बहरून आली
पूर्वीचेच क्षण तुझ्या सहवासात नव्या आनंदाने बहरून आले
पूर्वीचेच दिवस तुझ्याप्रमाणे नव्या चैतन्याने सजून गेले
आता आणखी काही नको
हवी आहे ती फक्त तुझी साथ आणि तुझ्या प्रेमाचं अनमोल नातं
बस्स आणखी काही नको काहीच
वाढदिवसाच्या प्रेमशुभेछा

Happy Birthday Wishes in Marathi For Girl

तुमचा वाढदिवस ख़ास आहे
कारण तुम्ही आमचे प्रेरणास्थान आहात
या सुखी आणि समृद्ध परिवाराचा
तुम्हीच तर खरा मान आहात
बाबा तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा

येणारा प्रत्येक दिवस तुमच्या आयुष्यात
भरभरून यश आणि आनंद घेऊन येवो
देवाकडे एवढीच प्रार्थना आहे कि
तुम्हाला आयुष्यात वैभव प्रगती आरोग्य
प्रसिध्दी आणि समृद्धी मिळावी
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

सुगंध बनून तुझ्या डोळ्यात सामावेन
समाधान बनून तुझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देईन
समजून घेण्याचा प्रयत्न करत दूर राहूनही
मी तुझ्यासोबतच असेन वाढदिवसाच्या शुभेच्छा

नेहमी निरोगी रहा तंदुरुस्त राहा
आणि जीवनातील सर्वोच्च ध्येय साध्य करा
आजचा दिवस खूप खास आहे
भूतकाळ विसरून जा आणि
नेहमी भविष्याकडे मार्गस्थ व्हा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

आज तुझा वाढदिवस
वाढणार्‍या प्रत्येक दिवसागणिक
तुझं यश तुझं ज्ञान आणि
तुझी कीर्ती वृद्धिंगत होत जावो
आणि सुखसमृद्धीची बहार
तुझ्या आयुष्यात नित्य येत राहो
वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा

Happy Birthday Wishes in Marathi For Girl

उगवता सूर्य तुम्हाला प्रखर तेज देवो
उगवणारी फूल तुमच्या आयुष्यात गंध भरावी
ईश्वर तुम्हाला सर्व सुख आणि समृद्धि देवो
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

आयुष्यातले सगळे क्षण आठवणीत राहतात
असं नाही पण काही क्षण असे असतात जे विसरु
म्हणताही विसरता येत नाहीत
हा वाढदिवस म्हणजे त्या अनंत
क्षणातला असाच एक क्षण
हा क्षण मनाला एक वेगळ समाधान देईलच पण
आमच्या शुभेच्छांनी वाढदिवसाचा हा क्षण
एकसण होऊ दे हीच सदिच्छा

नातं आपल्या प्रेमाचं
दिवसेंदिवस असच फुलावं
वाढदिवशी तुझ्या
तू माझ्या शुभेच्छांच्या पावसात भिजावं

happy birthday status marathi

Happy Birthday Wishes in Marathi For Boy
happy birthday status marathi

Happy Birthday Wishes in Marathi For Boy

ह्या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी
आपली सारी स्वप्नं साकार व्हावी
आजचा वाढदिवस आपल्यासाठी
एक अनमोल आठवण ठरावी…
आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य
अधिकाधिक सुंदर व्हावं…
हीच शुभेच्छा
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

Happy Birthday Wishes in Marathi For Boy

यशस्वी व औक्षवंत हो
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा

आपल्या दोस्तीची किंमत नाही आणि
किंमत करायला कोणाच्या बापाची हिंमत नाही
वाघासारख्या भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

दुःख आणि वेदना तुझ्यापासून दूर राहाव्या
तुझी ओळख फक्त सुखाशी व्हावी
माझी फक्त हीच इच्छा आहे
तुझ्या चेहऱ्यावर सदैव आनंद राहावा
हॅपी बर्थडे माझ्या गोडुलीला

आपणास वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा
आई तुळजाभवानी आपणास
उदंड आयुष्य देवो

प्रेमाच्या या नात्याला
विश्वासाने जपून ठेवतो आहे
वाढदिवस तुझा असला तरी
आज मी पोटभर जेवतो आहे
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा

Happy Birthday Wishes in Marathi For Boy

केला तो नाद झाली ती हवा
कडक रे भावा तुच आहे छावा
भावाची हवाआता तर DJ च लावा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भावा

कितीही रागावले तरी समजून घेतले मला
रुसले कधी तर जवळ घेतले मला
रडवले कधी तर कधी हसवले
केल्या पूर्ण सर्व माझ्या इच्छा
वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा

जीवेत शरद शतं पश्येत शरद शतं
भद्रेत शरद शतं अभिष्टचिंतनम
जन्मादिवसस्य शुभाशय
जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा

तुझ्या येण्याने आयुष्य सुंदर झालं आहे
हृदयात माझ्या तुझी सुंदर छबी आहे
चुकूनही जाऊन नकोस माझ्यापासून लांब
प्रत्येक पावलावर मला तुझी गरज आहे
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा

Happy Birthday Wishes in Marathi For Boy
मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा

Happy Birthday Wishes in Marathi For Son

वेळ किती लवकर जातो
कालपर्यंत माझे बोट धरून चालणारा माझा मुलगा
आज स्वताच्या पायावर उभा आहे
मुला तू तुझ्या आयुष्यात अधिकाधिक
यश प्राप्त करो हीच परमेश्वराला प्रार्थना
माझ्या प्रिय मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा

Happy Birthday Wishes in Marathi For Son

बेटा तू कितीही मोठा झाला तरी
आमच्यासाठी प्रिय व लहान बाळचं राहशील
तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा

सुख, समृद्धी, समाधान, धनसंपदा,
दीर्घायुष्य व आरोग्य लाभो तुला,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Happy Birthday Son

तु माझ्या आयुष्यातील प्रकाश आहेस
आणि नेहमी माझा लाडका मुलगा राहशील
वाढदिवसाच्या या दिवशी तुला वडिलांकडून भरपूर शुभेच्छा

आजच्या या शुभ दिवशी मी प्रार्थना करतो
की तू पाहिलेले सर्व स्वप्न येणाऱ्या आयुष्यात पूर्ण होवोत
Happy Birthday Son

Happy Birthday Wishes in Marathi For Son

तू माझ्या पोटी जन्म घेतलास हे माझे सौभाग्य आहे
बाळा तुझ्या वाढदिवसानिमित्त वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

तुझ्यासारखे उत्कृष्ट मुल मिळाल्या बद्दल
मी परमेश्वराचे दररोज धन्यवाद मानतो
मला तुझा खूप अभिमान आहे
तुझ्या वाढदिवसानिमित्त अनंत आशीर्वाद व शुभेच्छा

अगणित मुले या जगात जन्माला येतात
परंतु तुझ्यासारखा अज्ञाकारी व्यक्तिमत्व असलेला मुलगा
नशीबवान लोकांनाच मिळतो
Happy Birthday Son

Happy Birthday Wishes in Marathi For Son

नवा गंध नवा आनंद निर्माण
करीत प्रत्येक क्षण यावा व नव्या सुखांनी
नव्या वैभवांनी आनंद शतगुणित व्हावा
वाढदिवसाच्या भरपूर शुभेच्छा

तू ते गुलाब नाही जे बागेत फुलते
तू तर माझ्या जीवनातील ती शान आहे
ज्याचा गर्वाने माझे हृदय फुलते
तुझ्या चेहऱ्यावरचे प्रत्येक हसू
माझ्यासाठी एक भेट आहे
माझ्या प्रिय मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा

मामाला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश

Happy Birthday Wishes in Marathi For Mama
मामाला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश

Happy Birthday Wishes in Marathi For Mama

आईवडिलांसोबत माझ्या जडणघडणीत
महत्त्वाचे योगदान देणाऱ्या माझ्या
मामांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Happy Birthday Wishes in Marathi For Mama

ईश्वर वाईट दृष्टी पासून दूर ठेवो तुम्हाला
चंद्र ताऱ्यांचे आशीर्वाद लाभो तुम्हाला
दुःख काय असते हे तुम्ही विसरून जावे
परमेश्वर इतका आनंद देवो तुम्हाला
Happy Birthday Mama

तुमच्यासारखे मामा असणे
हिरा मिळण्यासारखे कठीण आहे
तुमच्या सोबत घालवलेले प्रत्येक दिवस
परमेश्वराचे आशीर्वाद आहेत
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मामा

साखरे सारख्या गोड मामांना
मुंग्यालागेस्तोवर वाढदिवसाच्या शुभेच्छा
Happy Birthday mama

आयुष्याची सर्व सुखे आपल्याला मिळोत मामा
पण त्याआधी मला बर्थडे पार्टी द्यायला विसरू नका
वाढदिवसाच्या शुभेच्छा मामा

Happy Birthday Wishes in Marathi For Mama

पूर्ण होवो इच्छा तुमच्या
मिळो जगातील आनंद आपणास
जेव्हा आकाशाकडे मागाल तारा
तेव्हा परमेश्वर संपूर्ण आकाश देवो तुम्हास
Happy Birthday Dear mama

मामा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
माझ्या आदरणीय मामांना
मनापासून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
आणि सुखी जीवनासाठी प्रार्थना
Happy Birthday Mama

नाते आपल्या प्रेमाचे दिवसेंदिवस
असेच फुलत रहावे
आजच्या या वाढदिवशी तुम्ही माझ्या
शुभेच्छांच्या पावसात भिजावे
happy birthday mamashree

मामाचा वाढदिवस आला आहे
माझ्यासाठी आनंद घेऊन आला आहे
खूप नशीबवान आहे मी जो मला
तुमच्यासारखा मामा मिळाला आहे
Happy Birthday Mama

Happy Birthday Wishes in Marathi For Mama

मामा भाच्यासाठी मित्रापेक्षा कम नसतात
ज्यांचे मामा चांगले असतात
त्यांच्या कोणतेही आयुष्यात गम नसतात
हॅपी बर्थ डे मामा जी

आजचा दिवस खूप खास आहे
कारण आज माझ्या आयुष्यातील
स्पेशल व्यक्तीचा वाढदिवस आहे
आणि ते आहेत माझे मामा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मामा

वाहिनी साठी वाढदिवसाच्या शुभेच्छा

Happy Birthday Wishes in Marathi For Vahini
वाहिनी साठी वाढदिवसाच्या शुभेच्छा

Happy Birthday Wishes in Marathi For Vahini

चंद्रताऱ्या प्रमाणे चकाकत राहो तुमचे जीवन
आनंदाने भरलेले राहो तुमचे जीवन
वाढदिवसाच्या अनेकानेक शुभेच्छा वहिनी

Happy Birthday Wishes in Marathi For Vahini

आजचा हा शुभ दिवस तुमच्या जीवनात शंभर वेळा येवो
आणि प्रत्येक वेळी आम्ही शुभेच्छा देत राहो
माझ्या प्रिय वहिनीला वाढदिवसा निमित्त अनेक शुभेच्छा

जशी बागेत दिसतात फुले छान
तशीच दिसते दादा आणि तुमची जोडी छान
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा वहिनी

परमेश्वराचे अनेक धन्यवाद कारण त्यांनी मला जगातील
सर्वात सुंदर, प्रेमळ आणि समजदार वहिनी दिली
माझ्या प्रिय वहिनीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

परीसारख्या आहात तुम्ही
तुमच्या सोबतीने भाऊ झालेत आनंदाचे धनी
प्रत्येक जन्मी दादाला तुमची सोबत मिळावी
हीच प्रार्थना मी आज करतो मनी
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा वहिनी

Happy Birthday Wishes in Marathi For Vahini

नात नसल जरी रक्ताच
पण त्याहूनही घट्ट करूया
आयुष्यात भेटलेल्या
आईच्या दुसऱ्या रूपाला वहिनी हे नाव देऊया
हॅप्पी बर्थडे वहिनी

सुंदर आणि कोमल फुलपाखराप्रमाणे
संपूर्ण घरात प्रेमाचे रंग पसरवणाऱ्या
वहिनीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

तुमच्यासोबत चा प्रत्येक क्षण खास आहे
वहिनी तुम्ही माझ्या हृदयाच्या खूप पास आहेत
Happy Birthday my sister In law

गोरी गोरीपान फुलासारखी छान
माझी वहिनी सौंदर्याची खाण
वहिनी साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Happy Birthday Wishes in Marathi For Vahini

आनंदी क्षणांनी भरलेले
तुझे आयुष्य असावे,
हीच माझी इच्छा
वहिनी तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

सोन्यासारख्या माझ्या वहिनीला
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा

आणखी वाचा : Best Attitude Status in Punjabi

मित्रांनो, जर तुम्हाला हा Happy Birthday Wishes in Marathi – वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा चा संग्रह आवडला असेल तर नक्कीच आपल्या मित्रांसोबत शेअर करा. आणि आम्हाला Twitter, Facebook आणि Instagram वर Follow करा.

Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]