मराठी कविता आई – Marathi Poem on Mother – Aai Marathi Kavita – मित्रांनो, आम्ही आईवर लिहिलेल्या काही उत्कृष्ट कविता संग्रहित केल्या आहेत. खरं बघायला गेलं तर आईची कोणतीच व्याख्या होऊ शकत नाही.
कारण आईची व्याख्या करण्याइतकी ताकद जगातल्या कोणत्याही लेखनी मध्ये नाही. आई ही पवित्रता, त्याग, प्रेम, प्रेम यांचे प्रतीक आहे जिचे ऋण कधीही फेडता येणार नाही. ती आईच असते जी सर्वांची काळजी घेत असते, त्याच आई साठी मराठी कवितांचा खाली संग्रह दिला आहे.
Page Contents
Aai Marathi Kavita मराठी कविता आई
तुझी आठवण येते गं आई कविता मराठी
तुझी आठवण येते गं आई
मन शोधतं असते तुजला, तु येना गं आई
देवाच्या त्या घरी
आज अवचीत काय घडले
का तुजला देवाने
मज पासनू दुर नेहले
फोटोशी बोलतो मी
परी उत्तर मिळत नाही
स्वप्नांमध्ये आई
तु का गं येत नाही ?
तुझी आठवण येते गं आई
मन शोधतं असते तुजला, तु येना गं आई
हिरमुसुन जातो बाबा
परी लाड पुरवती माझा
तझ्या आठवणींचा हुांदका
का येतो गं आम्हाला
किती विसरावे मी तुला
परी, आठवतेस तु मला
स्वप्नामध्ये आई
तु दर्शन दे गं मला
तुझी आठवण येते आई गं
मन शोधतं असते तुजला, तु येना गं आई
Aai Marathi Kavita
एका आईची अंतयात्रा – मराठी कविता
आता सर्व काही आठवेल तुला
अगदी सर्व सर्व…
कदाचित रडशीलही
प्रेक्षकांच्या आग्रहास्तव…
तूला जन्म दिला होता
याची परतफेड करशील…
मान खाली घालशील
शरमेने…
खांद्यावर घेशील तेव्हा
तहान शमेल मस्तकातली…
किणार्यावर पोहोचवशील
पाचव्या ईसमाच्या मदतीने…
हे करतांना क्षणभर का होईनात
पण…
आठवेल का रे तुला
माझा खांदा…?
घामांच्या धारांतून वाहणारा माझाच अंश
तुझ्या डोळ्यांतील भावनेला कवटाळेल
नकळत…
तेव्हा तरी संवेदनांची जाणीव होईल का रे
तुला…?
सर्व काही रितसर पार पाडशील
उघडा-नागडा माझा देह, उकळून घेशील भाजण्याआधी…
जाळशील आणि जळशील
देखावा सजवशील, अखेरचा…
माझा आणि तुझाही
माझा आणि तुझाही
तुझी प्रेमस्वरुप आई
Aai Marathi Kavita
आई असं नाव ठेवलं कोणी – मराठी कविता
आई तुझं ‘आई’ असं नाव ठेवलं कोणी?
नाही अपेक्षा, नाही तक्रार
असं वागायला शिकवतं का गं तुला कोणी?
पोटभर जेवायला देते तू सगळ्यांना
स्वतःसाठी मात्र शिळेच असते तुझ्या ताटात
आई माझी माय माझी तुझी महिमा किती छान गं
कवियात्रींना पण दिसे तू दुधावरची साय गं
घरात आल्या पाहूण्यांना नेसवते साडी छान ग
पदर तुझा पण फाटका, तुला दिसत कसं न्हाय गं
माझं बाळ, माझा शोन्या दिवस रात्र बोलत राहतेस
थकत कशी न्हाय गं?
समुद्रा एवढे प्रेम देतेस तुला मिळते तरी काय गं?
आई तुझं ‘आई’ असं नाव ठेवलं कोणी?
नाही अपेक्षा, नाही तक्रार
असं वागायला शिकवतं का गं तुला कोणी?
Aai Marathi Kavita
आई म्हणताच गळा भरून येतो – कविता मराठी
आई म्हणताच गळा भरून येतो
अश्रुंचा पुर जणु खुप दुरुन येतो
आईच्या शब्दातच माया आहे
ती मृदु मुलायम, जणु देवची काया आहे
ती पावसाची पहिली धार आहे
ती देवाच्या गळ्यातला फुलांचा हार आहे
आईच्या रुपात देव जणु वरुन येतो
आई म्हणताच गळा भरून येतो
अश्रुंचा पुर जणु खुप दुरुन येतो
माझ्या डोळ्यातले अश्रु, तिच्या डोळ्यात जमा होतात
माझे सारे अपराध, तिच्या मिठीत क्षमा होतात
तिच्या पदराला नेहमी माझा गंध येतो
अन माझ्या भवती तिला आनंद येतो
एवढा मायेचा पाझर कुठून येतो
आई म्हणताच गळा भरून येतो
अश्रुंचा पुर जणु खुप दुरुन येतो
तिच्या प्रेमला तोड नाही
तिच्या माये एवढी कुठलीच गोष्ट गोड नाही
माला न समजनार, ती एक कोड आहे
माझ्या प्रेमात तिच मन वेड आहे
प्रेमाच्या लढाईत देव ही हारून येतो
आई म्हणताच गळा भरून येतो
अश्रुंचा पुर जणु खुप दुरुन येतो
Aai Marathi Kavita
Marathi Poem on Mother
मित्रांनो, आई या शब्दाची व्याख्या लिहू शकेल, अशी एकही लेखनी आजपर्यंत जगात तयार झालेली नाही. जगात आई हे ईश्वराचे दुसरे रूप आहे असे म्हणतात. आईच्या प्रेमाला किंमत नसते, असं म्हणतात की ते लोक खूप भाग्यवान असतात, ज्यांच्या डोक्यावर आईचा हात असतो, नशीब सुद्धा त्यांची कधी साथ सोडत नाही. या पोस्टमध्ये आईला समर्पित आईवरील मराठी कविता Marathi Poem on Mother शेअर केल्या आहेत.
आई म्हणजे अशी माया – मराठी कविता
आई म्हणजे अशी माया
जिला अंत नाही
मी वेडा पाण्यात पाहतो जेव्हा
आईचेच प्रतिबिंब मला दिसत जाई
कविता लिहाविशी वाटते आईवर
तर कधी गावे वाटते तिचे गुणगान
प्रेम शोधले जगात तरी ही
मिळणार नाही आईचे प्रेम महान
अरे प्रेम, लाड, मदत
हे तर सर्वांची आई करते
पण माझ्यासाठी आई जे करते
ते मला जगातल्या आईंपेक्षा वेगळे वाटते
सातसमुद्रांच्या पलिकडे
डोंगरदर्यांच्या अलिकडे
अश्या ठिकाणी न्यावे आईला
जिथे वात्सल्य व आईच दिसावी सगळीकडे
मोठा झालो असलो तरी मी
आईसमोर लहान आहे
पुन्हा बालपणात जावून
आईच्या कुशीत निजण्याची तहान आहे
Aai Marathi Kavita
माझं दैवत घरात – कविता मराठी
माझं दैवत उभं
माझ्याच घरात
आयुष्यभरासाठी
‘आशीर्वाद’ देण्यास
माझ्या मना
काहीच कळेना
विसर मनाला
लागलो वारीला
वारी-वारी करून
झालो मी बारीक
खर्चुनी घरचं धन
लागली मनास सल
सुखाच्या मी शोधात
कपाळी बुक्का लावत
माझं दैवत घरात
मी निघालो वारीत
देहू-आळंदी झाले
पंढरी झाली-काशीलाही गेलो
मिसळलो मी वारीत
गुलाल खोबरे उधळत
उशिराने कळुनी
चुकले मनास
‘वैभवाचं मंदिर’
त्यावर कळस
‘तुळशीसम’ प्रसन्न
सगळीकडं सहभाग
सुखदुखात सोबत
‘मना हिरवं रोपटं’
आली दाटुनी
नयनी आसवे
मन माझे
पोरके झाले
होतं घरीच दैवत
मी निघत वारीत
मी निघत वारीत
माझं दैवत घरात
Aai Marathi Kavita
आई मराठी कविता
कुणीच नाही माझे आई
करूणेचे तळहात पोरके आई
आकांत श्वासांत, शांतता कुजबुज टाळे माझे आई
ना शुन्य आसपास, काळोख मावळे माझे आई
असे जवळ – तसे दूर भाबडे अंतराळ माझे आई
कुणीच नाही माझे आई
करूणेचे तळहात पोरके आई
असेल! आहे! असणार? कुणी शब्द गाळले माझे आई
अपराध असा परमेशाचा, का? तेज लोपती माझे आई
अभेद्य चौकट अश्रुंची, चित्र पुराणे माझे आई
कुणीच नाही माझे आई
करूणेचे तळहात पोरके आई
Aai Marathi Kavita
फिरी येता परतुनी – मराठी कविता
ओढीने घरट्याच्या
उडे पाखरू सांजेला
मन धावे तुझ्याकडे
कुशी घे ग लेकराला
ढोरं कष्ट उपसुन
जीव थकला भागला
न्हाऊ माखु घाल मज
डोळे आले हे निजेला
मागे लागुन सुखाच्या
जरी गाव मी सोडला
क्षणभर ना मला
तुझा विसर पडला
व्याकुळला जीव माझा
आई तुझ्या ग भेटीला
आठवाने तुझ्या आज
गळा माझा ग दाटला
घाम गाळुन बहुत
जरी पैका हा साठला
कागदाच्या तुकड्याने
लेक आईला मुकला
वाटे सगळे सोडुन
गाव आपला गाठावा
सेवा करताना तुझी
देह मातीत मिळावा
दिस सुखाचे दावण्या
लेक परतून आला
पुरे झाले ते राबणे
थोडा घे आता विसावा
थोडा घे आता विसावा
Aai Marathi Kavita
होय मी गर्भाशय बोलतोय – कविता मराठी
होय… मी गर्भाशय बोलतोय
असहाय झालेला
कसल्याशा पाण्यात ठेवलेला
अन् चक्क बाटलीत कोंडलेला
वयाच्या चौदा-पंधराव्या वर्षी तर
किती सोहळे माझ्या आगमनाचे
आजीला आनंद, मुका नातू झाला
अन् हिरवा फ्रॉक
गच्च ओटीने भरला
विवाहानंतर तर माझी किंमत
आभाळा एवढी झाली
तुझी अडीच किलोची ओझी
पृथ्वी होउन मी पेलल
अगं, माझा जीव तो किती?
पण त्यात आणखी एक जीव
तो ही अडीच तीन किलोचा
नऊ महिने पोसायचा
पण चकार शब्द ही नाही काढायचा?
पण, कधी बाहेर आलो नाही
अन् किरकिर ही केली नाही
आधारहीन आभाळासारखं
मुकाटपणे वेदना झेलल्या
अन् सुखकर सावल्या
तुझ्या पदरात अलगद ठेवल्या
पण… पण
आज तू मला विसरलीस?
करा करा कापून
बाटलीत भरून
स्ट्रेचरवर शांत पहुडलीस?
कारण काहीही असो
पण यौवनाची जाणीव अन् अनुभव
कायम देणारा तुझा मित्र
तू कायमचा दूर केलास
अगं, एकदाच बघ माझ्याकडे
अन् विचार तरी तू का चाललास?
खरं खरं सांग
मी गेल्यावर आठवेल ना
जुना सोहळा कौतुकाचा?
कधी तरी थॅंक यु म्हणून
कटाक्ष टाक ना ग शेवटचा
श्रीमंत मी केलं
तुला मातृत्व बहाल करून
तू मात्र मला रितं केलं
उकिरड्यावर फेकून
साक्षी खडकीकर
Aai Marathi Kavita
आवली माय – मराठी कविता
अवलीमाय
मागे राहिलीस का अशी ?
घरात परब्रह्म असताना
मोक्षाची वाट टाळलीस कशी ?
आठव भांडाऱ्यावरचा नामाचा उत्सव
अन् घरातला विठ्ठलाचा गजर
घेऊन जायचीस नित्य अन्नाची शिदोरी
तशीच जाऊन मागोमाग
बसायचं की तुकारामांच्या शेजारी
तशी अवलीमाय डबडबली
मातृत्व शक्ती तिच्यात संचारली
मग ती भराभरा शब्दांचा प्राजक्त
सांडून मोकळी झाली
म्हणाली…
नऊ महिने गर्भात जोडलेली नाळ
अचानक तोडू अशी
परिस्थितीच्या लाटेत होरपळतील ना बाळ
भुकेच्या खाईत लोटू कशी ?
तुकारामांच्या मागे जाऊन
मिळवला ही असता मोक्ष
पण आईची वाट बघत
थंडीत उघडी पडतील लेकरं
अन् संकटात
भेदरून जातील ना माझी कोकरं
बाळ नजरेसमोर दिसली
अन् माझ्यातली आई जागी झाली
मी म्हटलं
अगं माय
मोक्ष अन् परब्रह्म ही तू नाकारलं
खडतर आयुष्यात ही देवत्व
नाही घेतलं
परत एकवार
सिध्द झालं
परब्रह्म ही थिटं पडलं
मातृत्वापुढं
Aai Marathi Kavita
ये ना गं आई – मराठी कविता
तशी जवळ ये ना गं आई
तुझ्या पदराखाली मला झाक ना गं आई
मग दिसणार नाही अंधार मला
काही काळ तरी
तेवढीच जगेन क्षणभर
ये ना गं आई
घरटं माझं सावरायला ये ना गं आई
काही काळ निवांत राहिल मी आई
मोडणार नाही घरटं तुझ्यामुळे तरी
एवढीच आस जागते उरी
पण येशील ना गं आई
तुझी मायेची चौघडी माहेरीच राहिली
प्रश्नांच्या गराडयात मी गोहूनच गेले
भावना माझ्या गोठण्याआधी
उब देशील ना आई
खरंच लवकर येशील ना गं आई
जन्म देऊन कर्तव्य संपलं का गं आई
तुझ्या उबेची उणीव जाणवते गं आई
प्रश्नांचे चटके जाळुन टाकतील मला
जगवायला तरी येशील ना गं आई
शेवटची वेळ आली तरी
जवळ नाहीस आई
बाळाची परीक्षा किती घेणार आई
तळमळ तूझी सारी संपली का आई
इतकी निष्ठूर तू कधीच नव्हतीस गं आई
Aai Marathi Kavita
आई-बाबा मराठी कविता
आई हे ममतेचं पाझर आहे,
आपल्या घट्ट मिठीत घेऊन ती
मायेचं फुंकर घालणारी ममता आहे,
मुलांचे लडीवाळपणे लाड पुरवणारी
ती माता आहे,
स्वतःचा घास आपल्या मुलांना भरवून
मोठी करणारी ती आई आहे
वडील हे खंबीर नेतृत्वाचे प्रतिक आहे,
फणसाला बाह्यरुपाने जरी असले काटे
तरी अंतरी सदैव गोडवाच असतो,
स्वतः मात्र कश्याही परिस्थितीत राहून
मुलांच्या भवितव्यासाठी मोठी मोठी
स्वप्ने पूर्ण करण्यासाठी झटणारे वडील असतात,
वडील घरचे आधारस्तंभ असतात, त्यांच्या
असण्याने कुणाही परकियांची वाकड्या नजरेने
बघण्याची हिंमत नसते,
असे हे संसार गाडा सुरळीत चालवणारे
आई बाबा असतात
Aai Marathi Kavita
Read More : Birthday Poem in Marathi
Tags : मराठी कविता आई, Marathi Poem on Mother, Aai Marathi Kavita, marathi kavita, kavita marathi, aai sathi marathi kavita, best poem for aai, aai kavita in marathi, mom poem in marathi, mother poem in marathi, poem for mummy in marathi, best marathi kavita, marathi poem for mother